Main Featured

राम जन्मस्थळ वाद: भारत-नेपाळमध्ये 'रामायण सर्किट'वर चर्चा


India-Nepal-meeting


सीमावादामुळे भारत आणि नेपाळच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळमध्ये राजनयिक पातळीवर चर्चा झाली आहे. नेपाळ- भारतमधील ओवरसाईट मॅकन्झिमची ही आठवी बैठक पार पडली असून या बैठकीत 'रामायण सर्किट'वरही चर्चा झाल्याचे समजते.

मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ नेपाळमध्ये असल्याचा दावा केला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी नेपाळच्या माडीमध्ये राम मंदिर बांधण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
Must Read 

दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकरदास बैरागी आणि भारताचे नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा होते. या बैठकीत दोन देशांमध्ये परस्पर सहकार्यातून करण्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. त्याशिवाय या बैठकीत रामायण सर्किट बाबतही चर्चा झाली. यानुसार दोन्ही देशांमध्ये रामायणाशी निगडीत असलेल्या काही महत्त्वांच्या स्थळांचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार नेपाळमधील जनकपूर आणि भारतातील अयोध्या दरम्यान बस सेवादेखील सुरू आहे.