Main Featured

हिंदुस्थानसह ‘हे’ 5 देश 15 ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या





15 ऑगस्ट, 1947 ला हिंदुस्थान स्वातंत्र्य झाला. हिंदुस्थानचा 74 वा स्वातंत्र्य दिन अगदी एक-दोन दिवसांवर येऊन ठेपला असून याची लगबग सुरू झाली आहे. दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या परेडची रंगीत तालीम आज घेण्यात आली. मात्र फक्त हिंदुस्थानच नाही तर अन्य पाच देश देखील या दिनाची वाट पाहत असतात, कारण या देशात देखील 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. जाणून घेऊया हिंदुस्थानसह कोणत्या देशात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो…
1. दक्षिण कोरिया (South Korea)
हिंदुस्थानसह दक्षिण कोरिया देखील 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट, 1945 ला दक्षिण कोरियाने जपानकडून स्वातंत्र्य मिळवले. यूएस आणि सोविएत संघाच्या फौजांनी कोरियाची जपानच्या तावडीतून सुटका केली. हा दिवस कोरियन ‘नॅशनल हॉलीडे’ म्हणून साजरा करतात.
2. उत्तर कोरिया (North Korea)
दक्षिण कोरियाप्रमाणे उत्तर कोरिया देखील याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. दोन्ही देश 15 ऑगस्ट, 1945 ला जपानच्या तावडीतून मुक्त झाले. उत्तर कोरियन देखील हा दिवस ‘नॅशनल हॉलीडे’ म्हणून साजरा करतात. सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी लग्न करण्याची परंपरा येथे आहे.
15 ऑगस्ट, 1971 ला बहरीन ब्रिटनच्या जोखडातून मुक्त झाला. ब्रिटिश फौजांनी 1960 च्या दशकातच बहरीन सोडले होते, मात्र 15 ऑगस्ट, 1971 ला बहरीन आणि ब्रिटन यांच्यात एक ट्रीटी झाली होती आणि तेव्हापासून ब्रिटनने बहरीनला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. असे असले तरी बहरीन 16 डिसेंबरला नॅशनल हॉलीडे साजरा करतो, कारण याच दिवशी बहरीनचा शासक इसा बिन सलमान अल खलीफा याने बहरीनची सत्ता मिळवली होती.
Must Read
आफ्रिकन देश कॉन्गोला 15 ऑगस्ट, 1960 ला स्वातंत्र्य मिळाले. हा देश फ्रान्सच्या जोखडातून मुक्त झाला. 1880 पासून हा देश फ्रान्सच्या तावडीत होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा ‘रिपब्लिक ऑफ कॉन्गो’ बनला.
लिकटेंस्टीन या देशाने 15 ऑगस्ट, 1866 ला जर्मनीकडून स्वातंत्र्य मिळवले. 1940 पासून हा देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. लिकटेंस्टीन हा जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे.