Main Featured

मोठी बातमी! हुपरीत कोरोना २०० पार
Corona Positive found in Hupari

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दोनशे पार गेला (Corona Positive found in Hupari)आहे. तर कोरोनाने एकूण आठ जणांचा बळी घेतला आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या २४ तासात २ करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुपरीत नगरपरिषद परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर नगरपरिषदेच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. 


Must Readहुपरीत (Corona Positive found in Hupari) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे मिटर सुसाट सुटले आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एक महिला आणि एक पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात भीतीते वातावरण निर्माण झाले असून हुपरीतील कोरोना रुग्णाचा आकडा २०० पार गेला आहे. हुपरी हे शेजारील पाच गावाची मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याचबरोबर हे शहर कर्नाटक सीमेला लागून असल्याने सीमा भागातील लोकांची ये-जा कायम असते.