Main Featured

1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या सोन्यावर चोरटयांनी मारला डल्ला


Three houses stolen thif during the rains in patna

इचलकरंजी येथे  गावभागातील मुजावर पट्टी परिसरात असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 1 लाख 28 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. गुरूवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून याबाबतची फिर्याद अमिर मुस्तफिर खान (रा. पुजारी मळा) यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, अमिर खान यांची बहिण रमिजा सय्यद या गावभागातील मरगुबाई मंदिर समोर असलेल्या मुजावरपट्टी येथे राहतात. त्या सद्या खान यांच्य घरी राहण्यास आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. बुधवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. घरातील स्वयंपाक घरात असलेल्या लोखंडी तिजोरीतील 80 हजार रुपये किंमतीचे 25 ग्रॅम सोन्याची कर्णफुले, झुमके तसेच 34 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे मणीगंठण व 16 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे टॉप असा सुमारे 1 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. अधिक तपास. पोहेकॉ शेखर शिंदे करत आहेत.

इचलकरंजी, प्रतिनिधी - हातकणंगले तालुक्यातील कबनुर येथे घरातील 40 हजार रुपये किंमतीचे दिडतोळे सोन्याचा लक्ष्मीहार चोरीस गेला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सुष्मा शिवराज आवळे (रा. साजणी), सायली सुशांत घोंगडे व सुशांत घोंगडे (दोघे रा. फुलेनगर कबनुर) या तिघा संशयीतांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्याद दिपाली अमोल चव्हाण (वय 29, रा. लालनगर, इचलकरंजी) यांनी दिली आहे.

लालनगर येथे राहणार्‍या दिपाली चव्हाण यांच्या आई कबनूर येथे राहण्यास आहेत. चव्हाण यांनी आपल्याकडील 40 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार आईकडे ठेवण्यास दिला होता. 25 ऑगस्ट रोजी सदरचा हार घरातून चोरीस गेल्याचे चव्हाण यांच्या आईच्या निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेऊनही दागिना मिळाला नाही. याच दरम्यान साजणी येथील सुष्मा आवळे तर कबनुर येथील सुशांत घोंगडे त्याची पत्नी सायली घोंगडे या त्यांच्या घरी वास्तव्यास होत्या. या तिघांवर संशय व्यक्त करीत चव्हाण यांनी चोरीबाबत शिवाजीनगर पोलीसात तक्रार दिली आहे.