Main Featured

कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासीयांचा उस्फूर्त प्रतिसाद


Ganesh Chaturthi 2017: List of artificial ponds to ensure eco-friendly  immersions


इचलकरंजी येथे नगरपालिकेने घरगुती गणेश मुर्ती, विसर्जनासाठी केलेल्या फिरता गणेश मूर्ती विसर्जन रथासह कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासीयांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत 31 हजार 200 गणेश मुर्ती नगरपालिका प्रशासनाकडे नागरीकांनी विधीवत विसर्जन करून सुपूर्द केल्या. तर सुमारे 18 टन निर्माल्य जमा झाले होते.


इचलकरंजी शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना  केल्या आहेत. त्याचबरोबर घरगूती गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होवु नयेसाठी नगरपालिकेने घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी प्रथमच शहरातील प्रत्येक प्रभागात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या स्वरूपात 31 विसर्जन रथाची तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात 31 ठिकाणी कृत्रीम गणेश मूर्ती विसर्जन कुंड आणि निर्मांल्य कुंडाची व्यवस्था केली होती. त्याला शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्याकरिता पालिकेचे 31 विसर्जन रथ, 31 छोटा हत्ती टेंपो, 2 यांत्रिक बोटी, 1 अग्निशमन वाहन, 5 आयशर टेंपो यासह नगरअभियंता, आरोग्य अधिकारी, सहा. नगररचनाकार, सर्व विभाग प्रमुख, शाखा अभियंता, उपशहर अभियंते ,  स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग, वाहन विभाग, आरोग्य विभाग यांचेसह सुमारे 450 अधिकारी-कर्मचारी, 50 स्वयंसेवक संपूर्ण दिवस कार्यरत होते. या सर्व यंत्रणेवर मुख्याधिकारी संतोष खांडेकर लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्यासह शिवाजीनगर, इचलकरंजी ,शहापूर आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोकप्रतिनिधींही जनजागृती करत नागरीकांना गणेश मुर्ती कृत्रिम कुंडात विसर्जीत करण्यासाठी प्रोत्साहन दिले.