Main Featured

इचलकरंजीतील कुंभार बांधवांचं यावर्षी झालं नुकसान


These Kalyan artisans give shape to eco-friendly festival - mumbai news -  Hindustan Times


इचलकरंजी येथे  गणेशोत्सवासाठी बनवलेल्या मुर्ती शिल्लक राहिल्यानं इचलकरंजीतील कुंभार बांधवांचं यावर्षी नुकसान झालं आहे. त्यामुळं कुंभार बांधवांनी शिल्लक मुर्ती हातात घेऊन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडं नुकसान भरपाईची मागणी केली. तसंच त्वरीत सकारात्मक निर्णय न झाल्यास शिल्लक गणेश मुर्ती घेऊन रस्त्यावरील आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान कुंभार समाज संघानं भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याच्या मागणीचे निेवदन आमदार प्रकाश आवाडे यांना दिले आहे. 

कोरोना महामारीमुळं प्रशासनानं गणेशोत्सवावर निर्बंध घालत श्रींच्या मुर्तीच्या उंचीवरही मर्यादा घातली होती. तरीही इचलकरंजीतील कुंभार बांधवांनी सुमारे अडीच लाख श्रींच्या मुर्त्या तयार केल्या होत्या. गेल्या वर्षी महापुरामुळं कुंभार बांधवांना मोठा फटका बसला होता. त्यातून सावरत असतानाचं कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. गणेशोत्सवातील निर्बंध शिथील करण्यासाठी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींकडं मागणी करूनही त्याकडं दुर्लक्ष झालं.

 परिणामी 30 ते 40 टक्के गणेश मुर्ती शिल्लक राहिल्यानं कुंभार बांधवांचं प्रचंड नुकसान झालं. तसंच मुर्ती तयार करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणंही अवघड झालं आहे. त्यामुळं प्रत्येक कुंभारास अडीच लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आज इचलकरंजीतील कुंभार बांधवांनी शिल्लक मुर्ती घेऊन प्रांतकार्यालय गाठलं. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं. शासन आणि लोकप्रतिनिधींनी मागणीबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास शिल्लक मुर्ती घेऊन रस्त्यावरील आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात समाजाचे अध्यक्ष सुभाष कुंभार, उपाध्यक्ष उत्तम कुंभार, शंकर कुंभार, संजय कुंभार, सुरेंद्र कुंभार, निवृत्ती कुंभार, बाळू कुंभार, दिपक कुंभार, राहुल आरेकर, निखील कुंभार, रविकांत कुंभार यांचा समावेश होता.