Main Featured

गणेश आणि गौरींचे पर्यावरणपुरक विसर्जन करण्यास इचलकरंजीवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसादकोल्हापुरात बाप्पाचं विसर्जन आता तुमच्या दारी! अनोखी विसर्जन पद्धत


इचलकरंजी शहर परिसरात घरगुती गणेश आणि गौरींचे पर्यावरणपुरक विसर्जन करण्यास इचलकरंजीवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने शहरात विविध 31 ठिकाणी ठेवलेल्या कृत्रिम कुंडात आणि 2 फिरत्या विसर्जन रथात भाविकांनी आपल्या मुर्त्यांचे विसर्जित केल्या.
कोविड साथीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने नागरीकांना गणपती विसर्जनासाठी पंचगंगा नदी घाट आणि शहापूर येथील खण इथे न जाण्यासाठी आवाहन केले होते. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेच्या शहरातील प्रत्येक प्रभागात कृत्रिम कुंड ठेवले होते. त्याचबरोबर निर्माल्य एकत्रित करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र वाहनाची सोय केली होती.

नागरीकांनी देखील उद्भवलेली परिस्थिती पाहता सकाळपासूनच कृत्रिम कुंडामध्ये गणेश मुर्तीचे पर्यावरणपुरक विसर्जन करण्यास पसंती दिली होती. सकाळपासून सुरू झालेला ओघ रात्री उशिरापर्यंत सुरू होता. नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार त्याचबरोबरत शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, वाहतुक शाखेचे  पोलीस यांनी संपूर्ण दिवभरात विविध ठिकाणी भेटी देऊन नागरीकांची सोय केली.  नगरपालिका प्रशासनानं तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जन आणि निर्माल्य कुंडात निर्माल्य अर्पण करण्याकडं नागरिकांचा कल दिसून येत होता.

 विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेनंही योग्य नियोजन केलं होतं. त्यामुळं भाविकांना विसर्जनात अडथळा आला नाही. तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाड्याचा वापर न करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपरिषदेकडं केली होती. त्याला प्रतिसाद देत नगरपरिषदेने देखील निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाड्यांचा वापर टाळत लहान टेम्पो, मालवाहतुक टेम्पो यांचा वापर केला.