Main Featured

महावितरण कंपनीचे गणेशोत्सवात सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप


Sanitizer stand in Ganeshotsav, offering of vitamin tablets | महावितरण कंपनीचे गणेशोत्सवात सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप

कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवात कोल्हापूरात महावितरण कंपनीने सॅनिटायझर स्टॅन्डचे  वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
गणेशोत्सवात कोल्हापुर शहर विभागात महावितरणमधील पूर्व उप विभागातील जनमित्रांनी कोरोनापासून सुरक्षा म्हणुन शाहुपूरी, राजारामपुरी, टाकाळा, उद्यमनगर, प्रतिभानगर येथील शाखा कार्यालयात सॅनिटायझर स्टॅन्ड उपलब्ध करुन दिले.

महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन पाटिल, शाखा कार्यालयातील मुख्य तंत्रज्ञ अनिल काजवे प्रधान तंत्रज्ञ मनोज बगणे, दाविद कांबळे, संजु कांबळे, विजय दाभोडे यांनी पुढाकार घेतला.