Main Featured

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून इचलकरंजी नगरपालिकेला रुग्णवाहिका लोकार्पण

Satej Patil - Alchetron, The Free Social Encyclopedia
इचलकरंजी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-21 कोव्हिड 19 च्या निधीतून जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील ( Satej  Patil) यांच्या स्थानिक निधीतून इचलकरंजी शहरासाठी दिलेल्या रुग्ण वाहिकेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. पालिकेत झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजीरे यांनी रुग्णवाहिकेची चावी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे सुपूर्द केली

सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत या रुग्णवाहिकेचा शहरातील रुग्णांना चांगला लाभ होईल, असे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्य अधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक मदन कारंडे, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक शशांक बावचकर, शिक्षण सभापती राजु बोंद्रे,
नगरसेवक प्रकाश मोरबाळे, रविंद्र माने, दिपक सुर्वे, संजय केंगार, उदयसिंग पाटील, इकबाल कलावंत, माजी नगरसेवक महादेव गौड, शहाजी भोसले, बाबासाहेब कोतवाल, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत संगेवार उपस्थित होते.