Main Featured

समुह संंसर्गामुळे रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
Coronavirus Latest: India's Covid-19 Recoveries Rise To 22,455 ...


इचलकरंजी येथे  शहरात गेल्या काही दिवसापासून समुह संंसर्गामुळे रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये मंगळवारी काही अंशी दिला होता. मात्र आज पुन्हा विविध भागातील 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर बाधितांपैकी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या 2360 झाली असून बाधित मृतांची संख्या 106 वर पोहचली आहे.

आज दिवसभरात सरस्वती मार्केट, भोईनगर, शहापूर, बालाजीनगर, भोनेमाळ, संतमळा, जुना चंदूर रोड, मधूबन सोसायटी, परिट मळा, जवाहर नगर, धुळेश्वर नगर, हुनमान नगर, रेंदाळकर मळा, वर्धमान चौक, आसरानगर, सांगली रोड वठारे मळा, गावभाग, सुतार मळा, खंजिरे मळा, बिग बाजारनजीक, झेंडा चौक, शेळके गल्ली

 33 भागात 41 इतके रूग्ण आढळून आले.दरम्यान हुपरीमध्ये 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या 382 वर पोहचली असून कबनुरमध्ये दोघांना लागण झाल्याने बाधितांची संख्या 203 झाली आहे. कोरोचीतही आज एकाला लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला.त्यामुळे बाधितांची संख्या 109 वर पोहचली असून बाधित मृतांची संख्या 10 झाली आहे.