Main Featured

गौरी विसर्जनाची सोय घंटागाडी मध्ये न करता दुसऱ्या वाहनामध्ये सोय करावी : विश्व हिंदू परिषद बजरंग दल


Ganpati Visarjan 2020 Dates: गणपति विसर्जन से ...


इचलकरंजी  येथील गौरी विसर्जनाची सोय घंटागाडी मध्ये न करता दुसऱ्या वाहनामध्ये सोय करावी,अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने घरगुती गणपती गणेश विसर्जनाची सोय प्रत्येक वार्डनुसार कृत्रिम कुंडामध्ये केली आहे.तसेच गौरी विसर्जनाची सोय पालिका ही घंटागाडी मधून करणार आहे, हे करणे म्हणजे हिंदू धर्माचा अपमानच आहे. त्यामुळे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
               
दरम्यान,दान दिलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन योग्य त्या वाहनांमधून आदर व श्रद्धापूर्वक झाले पाहिजे असे म्हटले आहे.शिष्टमंडळात सोमेश्वर वाघमोडे, सुरज कांबळे,अशोकजी पुरोहित, शुभम नाईक,सुनील कांबळे आदी उपस्थित होते.