Main Featured

सात महिन्यांचं मानधन मिळालं नाही : कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स


ASHA workers in Karnataka spend hours tracing COVID-19 contacts ...


कोरोना संसर्गाच्या कालावधीत घरोघरी जाऊन सर्व्हे करणार्‍या आशा वर्कर्सना इचलकरंजी नगरपालिकेकडून सात महिन्यांचं मानधन मिळालं नाही. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियननं वाढीव मानधन मिळण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. हा विषय धोरणात्मक असल्यानं नगरपालिका सभेत चर्चा करून योग्य तो निर्णय करण्याचं आश्‍वासन उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात इचलकरंजी इथं 41 आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत. शासनाकडून त्यांना दिवसाला केवळ 33 रुपये मानधन मिळते. सध्याच्या महागाईच्या काळात या तुटपुंज्या मानधनानं घर कसं चालायचं असा प्रश्‍न आहे. तुटपुंज्या मानधनात उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असतानाही त्या सर्व्हेसाठी कार्यरत आहेत. या संकटात इचलकरंजी नगरपालिकेनं त्यांना 2 हजार रुपये मासिक मानधन देण्याचं कबूल केलं होतं.

फेब्रुवारीपासून आशा वर्कर्स आपला जीव धोक्यात नागरिकाचा सर्व्हे, जनजागृती करणे, औषधे वितरण आदी सेवा बजावत आहेत. त्यातूनच 6 सेविकांना कोरोनाची बाधा झाल्यानं त्यांचं कुटुंबही अडचणीत आलं आहे. मानधन संदर्भात नगरपालिकडं वारंवार पाठपुरावा करूनही मानधन मिळालं नाही. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स, गटप्रवर्तक युनियनच्या शिष्टमंडळानं नगराध्यक्षांची भेट घेऊन 26 ऑगस्टपर्यंत वाढीव मानधन न मिळाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी हा धोरणात्मक विषय असल्यानं नगरपालिका सभेत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचं आश्‍वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय युनियननं घेतला आहे.