Main Featured

दिग्गज राजकीय घराण्यात पुन्हा कोरोनाचा शिरकावCoronavirus Latest: India's Covid-19 Recoveries Rise To 22,455 ...

 इचलकरंजी येथे  आज सलग 51 व्या दिवशीही कोरोना बाधितांची शृंखला कायम आहे. शहरातील दिग्गज राजकीय घराण्यात आज पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामध्ये विद्यमान आमदारांच्या कुटुंबातील माजी नगराध्यक्षांसह तिघांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण 53 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या 1 हजार 581 झाली आहे. बाधितांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 78 वर पोहचली आहे.

शहरात आजमितीला 949 अ‍ॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू असून 554 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कबनुर येथे आज 5 जणांना लागण झाल्याने बाधितांची संख्या 95 झाली. त्यापैकी 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून 51 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हुपरी मध्ये आज दोघांची भर पडल्याने बाधितांची संख्या 327 झाली आहे. त्यापैकी 193 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोचीमध्ये होमगार्डला कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची संख्या 64 वर पोहचली आहे.