Main Featured

सार्वजनिक गणेश मंडळांस शासनाचे निर्णय व नियम बंधनकारकIchalkaranji ganesh darshan | ichalkaranji ganeshostav 2018 ...

इचलकरंजी येथे सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची मुर्ती 4 फुटांपेक्षा मोठी बसवू नये, मंडप 10 बाय 10 फुटाचाच  घालावा, श्री आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस परवानगी असणार नाही यासह शासन  निर्णय व नियम मंडळांना बंधनकारक राहतील अशा  नोटीसा येथील  शहापूर पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना  बजावल्या आहेत.

कोरोनाची महामारी थांबता थांबेनाशी झाली आहे. त्यामुळं गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या अडजणी समजुन घेऊन यावर्षी उत्सव कसा साजरा करावा याबाबत काही निर्बंध घातले आहेत. तसेच श्रींच्या मुर्तीची उंची, मंडपाचा आकार, मंडपात 5 हून अधिक कार्यकर्ते थांबू नयेत, विसर्जन मिरवणुकीस परवानगी नसल्यानं विसर्जनस्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असू नये,

सांस्कृतीक कार्यक्रम, सजीव-तांत्रिक देखावे आयोजित करू नयेत, शक्य असल्यास आरोग्य विषयक तसेच रक्तदान शिबीर, प्लाझ्मा दान वगैरे विधायक कार्यक्रम राबवावेत यासह उत्सव साजरा करण्यासाठी विविध 12 निर्बंध घातले असून शासनाचे निर्णय बंधनकारक राहतील अशा आशयाची नोटीसही बजावली आहे. त्याची अंमलबजावणी न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. याच पद्धतीनं शहरातील अन्य पोलीस ठाण्यांकडूनही मंडळाच्या पदाधिकार्‍यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्यानं यावर्षीचा उत्सव शासनाच्या निर्बंधात राहूनच साजरा करावा लागणार आहे.