Main Featured

कोरोना काळात मदतीसाठी इचलकरंजीकरांचा पुढाकार

ICHALKARANJI

कोरोना (CORONAVIRUS)संसर्गाच्या काळात अनेक रुग्णांना आधारवड ठरत असलेल्या आयजीएम रुग्णालयाच्या मदतीसाठी नागरिक, शिक्षक आणि अधिकारी वर्ग धावून आले आहेत. या सर्वांच्या मदतीने आयजीएम रुग्णालयासाठी प्रत्येक स्नानगृहासाठी लागणाऱ्या 50  यंत्राची पुर्तता वरील घटकांकडून करण्यात आली आहे. यामुळे आयजीएम रुग्णालयात आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय झाली आहे.


इचलकरंजीचे (ICHALKARANJI)सुपुत्र आणि जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या उपस्थितीत हे 50 यंत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवी शेटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. महाडिक यांची उपस्थिती होती.


Must Read


शासनाचे आयजीएम रुग्णालय आता हळूहळू कात टाकत आहे. याठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी समन्वयक म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इचलकरंजीचे रहिवासी असलेले रसाळ यांनी राज्यात विविध ठिकाणी अधिकारी म्हणून काम केले.  

आम्ही इचलकरंजीकर (ICHALKARANJI) या अधिकारी वर्गाच्या वतीने यापूर्वीच रुग्णालयासाठी मदत करण्यात आली होती. त्या वेळीच नागरिकांनीही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. रसाळ यांनी  वीस संच  दिले, तर त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इचलकरंजी नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी शशिकांत पाटील यांनी दहा, प्राथमिक शिक्षक देवदत्त कुंभार यांनी पाच तर आम्ही इचलकरंजीकर ग्रुपने 8 संच दिले आहेत.  

प्राथमिक शिक्षक शितल कुमार खोत, संदीप आळंदे, शंकर दिवटे, रावसाहेब कांबळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मोहन डिंगणे या नागरिकांनी 12 संच असे एकूण पन्नास संच आज रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले. यामुळे रुग्णालयातील पन्नास स्नानगृहात प्रत्येक ठिकाणी गरम पाणी उपलब्ध होणार आहे.