Main Featured

इचलकरंजीमधे कोरोना तपासणीनंतर पुढे आली धक्कादायक बाब

Ichalkaranji

इचलकरंजी (Ichalkaranji) येथील पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रक्तातील ऍन्टी बॉडी तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेकांना कोरोना (coronavirus)होवून गेल्याचे निदान झाले आहे. 90 पालिका कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 35 कर्मचाऱ्यांच्या रक्तात ऍन्टी बॉडी तयार झाल्याचे तपासणीतून दिसून आले आहे. 81 पोलीस कर्मचाऱ्यांच्या तपासणीमध्ये 7 जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी (Antybody test)आढळून आले आहेत. 


पालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने व डीकेटीई कोविड केअर सेंटरच्यावतीने ही तपासणी करण्यात आली. सुरुवातीला पालिकेच्या कार्यालयीन विभागात काम करणाऱ्या 51 जणांच्या रक्ताची तपासणी केली. त्यापैकी 16 जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी आढळल्या आहेत. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली. यामध्ये 39 जणांच्या तपासणीत 19 जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी तयार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांना कोरोना (coronavirus) संसर्ग होवून गेल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. Must Read
अनेकांना कोरोना संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्टकोरोना योद्धा म्हणून सुरवातीपासून आघाडीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या रक्ताची आज तपासणी (Ichalkaranji) केली. शिवाजीनगर, गावभाग, शहापूर व शहर वाहतूक शाखा अशा सर्वच ठिकाणच्या एकूण 81 पोलिस कर्मचाऱ्यांच्या रक्ताची तपासणी केली. त्यामध्ये सात जणांच्या रक्तात ऍन्टी बॉडी आढळून आल्यामुळे अनेक पोलिसांना कोरोना होवून गेल्याचे समोर आले आहे. शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून दोन हजारच्यापुढे कोरोना रुग्ण शहरात आढळून आले आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या शतकाच्या पुढे गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ऍन्टी बॉडी तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर ही मोहिम राबविण्यात आली आहे. 

आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य विभाग, डिकेटीई कोविड केअर सेंटरकडील डॉ.मिरजे, डॉ.ढाले तसेच प्रयोग शाळा तंत्रज्ञ वर्ग यामध्ये सहभागी झाला आहे. यापुढेही विविध स्तरातील नागरिकांची ऍन्टी बॉडी तपासणी केली जाणार आहे. यावरुन शहरात कोरोना संसर्गाची टक्केवारी समजण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार रक्तातील ऍन्टी बॉडी तपासणी मोहिम सुरु केली आहे. पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. आता आरोग्य सेवकांची तपासणी केली जाणार आहे.