Main Featured

विराटबाबत एका महिला क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा; पाहा काय म्हणाली!


जहाआरा-विराट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील (A woman cricketer expressed her desire for Virat) सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. धावसंख्या आणि शतक याबाबत विराट सचिनची स्पर्धा सचिन तेंडुलकरसोबत असल्याचे दिसते. विराट कोहली सारख्या आक्रमक आणि प्रतिस्पर्धा संघासाठी धोकादायक असलेल्या फलंदाजाची विकेट घेण्याची इच्छा प्रत्येक गोलंदाजाची असते. विराटची विकेटमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. एका महिला क्रिकेटपूने विराटची विकेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलम ही गेल्या एक दशकापासून राष्ट्रीय संघाकडून खेळत आहे. जहाआराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात २०११ साली गेली होती. आता बांगलादेशकडून वनडे आणि टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी ती गोलंदाज ठरली आहे. २७ वर्षीय जहाआराने आता तिची एक इच्छा व्यक्त केली आहे. जहाआराला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घ्यायची आहे.

Must read


विराट कोहली सध्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे आणि टी-२० आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून त्याने २०१९ साली वेस्ट इंडिज दौऱ्या माजी कर्णधार महेंद्र सिंह (A woman cricketer expressed her desire for Virat)धोनीला मागे टाकेल होते.

जगभरातील अनेक गोलंदाजांची विराट कोहलीला बाद करण्याची इच्छा आहे. बांगलादेशच्या या महिला गोलंदाजाने देखील अशीच इच्छा व्यक्त केली आहे. मला विराट कोहलीला बाद करायचे आहे, असे ती म्हणाली. आयपीएलबद्दल बोलताना ती म्हणाली, कोलकाता नाइट रायडर्स हा माझा आवडता संघ आहे. तर सनरायझर्स हैदराबाद कडून शाकिब अल हसन खेळत(A woman cricketer expressed her desire for Virat) असल्यामुळे या संघाला मी फॉलो करते असे तिने सांगितले.या शिवाय जहाआराने आणखी एक इच्छा व्यक्त केली. तिला भारतातील इडन गार्डन मैदानावर खेळण्याची इच्छा आहे. मला आजपर्यंत या मैदानावर खेळता आले नाही. कोलकाता आणि लॉर्ड्स मैदानावर आजपर्यंत संधी मिळाली नाही, असे ती म्हणाली.