Main Featured

हार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाला दिलं हे नावहार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाला दिलं हे नाव
स्टार कपल हार्दिक पांड्या  Hardik Pandya आणि नताशा स्टॅनकोविच यांनी आपल्या मुलाचं नाव 'अगस्त्या' ठेवलं आहे. हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याने एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तो टॉय कारसोबत खेळत आहे.हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी ३० जुलैला आपल्या मुलाचं या जगात स्वागत केलं. इंस्टाग्रामवर त्यांनी याची माहिती दिली होती.
नताशाने देखील फोटो शेअर केला आहे. नताशाच्या हातात बुके आहे तर हार्दिक आपल्या मुलाला सांभाळत आहे. नताशाने या फोटोसोबत 'माझं कुटुंब, माझं जग' असं कॅप्शन देखील दिलं आहे.
हार्दिकने १ जानेवारी २०२० रोजी दुबईमध्ये नताशा सोबत असलेलं नातं जगासमोर आणलं होतं. तर मे मध्ये नताशा ही प्रेग्नेंट असल्याची देखील त्यांनी माहिती दिली होती. नताशा स्टॅनकोविच ही मॉडल आणि बॉलिवुड अभिनेत्री असून 'सत्याग्रह' आणि 'फुकरे रिटर्न्स' सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. नताशा हे सर्बियाची नागरिक आहे.