Main Featured

Gold-Silver Rate Today- पुन्हा घसरले सोन्याचे भाव

Gold-Silver Rate Today

Gold-Silver Rate Today- अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे चेअरमन (US federal reserve chairman Jerome Powell)च्या भाषणानंतर सोन्याच्या किंमती (Gold Prices) मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते फेडरल रिझर्व्हच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अर्थात महागाई संपवण्यासाठी आणि नोकऱ्या वाढवण्यावर भर देण्यामुळे याचा परिणाम बुलियन मार्केटवर दिसून येत आहे. 


याआधीच्या सत्रामध्ये डॉलर इंडेक्स (US Dollar Index) सर्वात खालच्या स्तरावरून रिकव्हर झाला होता. ज्यामुळे सोन्याचांदीचे दर उतरले होते. यामुळे कॉमेक्सवर सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी कमी झाले आहेत. याच संकेतांमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात.

Must Read

आज भारतात किती स्वस्त होईल सोने? (Gold-Silver Rate Today)
तज्ज्ञांच्या मते 7 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतींनी देशांतर्गत बाजारात सर्वोच्च स्तर गाठला होता. यानंतर किंमतींमध्ये घसरण सुरू आहे. अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच राहू शकते.
गुरुवारी प्रति तोळा सोन्याचे भाव 743 रुपयांनी वाढून 52,508 रुपयांवर पोहोचले होते. याआधी बुधवारी दर 51,765 रुपये प्रति तोळा होते. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 3,615 रुपयांनी वाढले होते. ज्यानंतर चांदीचे दर वाढून 68,492 रुपये प्रति किलो झाले आहेत.
लवकरच मिळेल स्वस्त सोने खरेदीची संधी
सरकारकडून सॉव्हरेन गोल्ड बाँडचा सहावा आणि शेवटचा टप्पा (Sovereign Gold Bond Scheme) लवकरच सुरू करणार आहे. ही स्कीम 31 ऑगस्ट रोजी खुली करण्यात येणार आहे. दीर्घ काळाच्या फायद्यासाठी ही गुंतवणूक उपयोगाची आहे.
याआधी 3 ऑगस्ट रोजी या स्कीमचा पाचवा टप्पा (Series-V) सुरू झाला होता. यावेळी आरबीआयने सोन्याचे मुल्य 5,334 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केले होते. 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान ही ऑफर होती. एकूण सहा टप्प्यांमध्ये ही योजना असणार आहे. 31 ऑगस्टपासून याचा शेवटचा टप्पा आहे. दरम्यान हे बाँड ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देखील मिळेल.