Main Featured

Gold Rate Today- सलग तिसऱ्या दिवशी उतरले सोन्या-चांदीचे भाव

Gold Rate Today

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीत बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. स्थानिक सराफाबाजारात सोन्याच्या किंमती 210 रुपयांनी घसरून 51 हजार 963 झाल्या आहेत. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने 24 रुपयांनी कमी झाले असून त्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 51 हजार 755 रुपये झाला आहे. चांदीचा भाव 109 रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला 67 हजार 420 रुपये आहे.

तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आर्थिक आकड्यांमुळे अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ, कोरोना व्हायरसच्या उपचारासंदर्भात वाढणाऱ्या आशा आणि अमेरिका-चीनमध्ये ट्रेड डीलची शक्यता या सर्वांमुळे सोन्याचांदीच्या दरावर दबाव वाढत आहे. याच संकेतांमुळे आज देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

Must Read


तर, जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1918 डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव 0.9 टक्के घसरला असून तो प्रती औंस 26.45 डॉलर आहे. डॉलर इंडेक्समध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. बुधवारी कमाॅडिटी बाजारात सोने 900 रुपयांनी वधारले होते.

सराफा बाजारात असे होते दर (Gold Rate Today)

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 52,907 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 55,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर, आज दिल्लीत 22 कॅरेट सोने 49 हजार 860 रुपये असून २४ कॅरेटचा भाव 54 हजार 390 रुपये आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 410 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 51 हजार 410 रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी 68 हजार 530 रुपये आहे.

गुंतवणूक होईल फायद्याची

जर तुम्हाला सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. जर तुम्ही सोन्याच गुंतवणूक केली तर एका वर्षात 20 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या एका महिन्यात सोने 1850 ते 2000 डॉलर प्रति आउंसपर्यंत असेल. ऑगस्ट महिन्यात सोन्यातून सर्वात जास्त फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.