Main Featured

आणखी कमी होणार सोन्याचे भाव! शुक्रवारपासून 3395 रुपयांनी उतरले सोने, वाचा आजचे दर


आणखी कमी होणार सोन्याचे भाव! शुक्रवारपासून 3395 रुपयांनी उतरले सोने, वाचा आजचे दर

कोरोनाच्या संकटकाळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचांदीच्या किंमतींनी या कालावधीमध्ये रेकॉर्ड रचला होता. मात्र गेल्या आठवड्यातील शुक्रवारपासून सोन्याच्या किंमती उतरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये प्रति तोळा 56 हजारांवर गेलेले सोने आज 52 हजारांवर आले आहे. जवळपास 3000 रुपयांची घसरण या 4 दिवसांमध्ये झाली आहे. दरम्यान हे भाव आणखी उतरण्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर सोन्याचे अपडेटेट दर देण्यात येतात. यानुसार 07 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सोन्याचे भाव 56,126 रुपये प्रति तोळा होते. तर आज 13 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर (Gold Rates Today) प्रति तोळा 52,731 रुपये आहेत. म्हणजेच शुक्रवारपासून सोन्याचे भाव प्रति तोळा 3395 रुपयांनी कमी झाले आहेत.
Must Read
दरम्यान चांदीचे भाव देखील जवळपास 8 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार शुक्रवारी चांदीचे दर 75,013 रुपये प्रति किलो होते तर आज चांदी (Silver Rates Today) 66,256 रुपये प्रति किलो आहे. शुक्रवारपासून चांदीचे भाव प्रति किलो 8,757 रुपयांनी कमी झाले आहेत.
अमेरिकन बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर घसरू लागले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकन शेअर बाजारात खरेदी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचा मोर्चा पुन्हा शेअर बाजाराकडे वळला आहे. अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क इंडेक्स S&P 500 नवीन रेकॉर्ड स्तराच्या अत्यंत जवळ पोहोचला आहे.
Must Read

दरम्यान रशियातून कोरोना लशीसंदर्भात येणाऱ्या बातम्यांचा अमेरिकन शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याला नेहमी कठीण काळामध्ये झळाळी मिळते. 1970 च्या दशकात (Gold Rates Today)आलेल्या मंदीच्या काळात सोन्याच्या किंमती उच्च शिखरावर पोहोचल्या होत्या. त्याचप्रमाणे 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही अशीच काहीशी परिस्थिती होती. आकज्यांकडे लक्ष दिल्यास 80 च्या दशकात सोने सात पटींनी वाढून 850 डॉलर प्रति औंसच्या रेकॉर्ड स्तरावर होते.