Main Featured

सराफा बाजारात तेजी ; पाच सत्रानंतर सोने दरात झाली वाढ


सोने


करोना व्हायरसमुळे चालू वर्षात अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान केले असून अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक वाढवत आहे. कमॉडिटी बाजारात आज बुधवारी सोन्याच्या (silver and gold rate)किमतीत वाढ झाली. सध्या सोने ७७ रुपयांनी वाढले असून ५१००० झाले आहे. चांदीमध्ये मात्र नफावसुली सुरूच आहे. आज चांदी ४५० रुपयांनी स्वस्त झाली.

करोनाचे दृष्टचक्र कधी थांबणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आर्थिक नुकसान देखील प्रचंड झाले आहे. मागील पाच सत्रात सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली होती. मंगळवारी सोने ०.५ टक्क्यांनी घसरून ५०९२४ रुपयांवर बंद झाला होता. चांदीमध्ये २ टक्के घसरण झाली होती. सध्या कमॉडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव एक किलोला ६३६३४ रुपये असून त्यात ३७३ रुपयांची घसरण झाली आहे.

करोना काळात बँकांना २८ हजार ८४३ (silver and gold rate)कोटींना चुना लावला; फसवणुकीचे प्रमाण १५९ टक्क्यांनी वाढले सराफा बाजारात (spot market) आज सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ५१३६० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी कमी होऊन १९२७.९ डॉलर प्रती औंस झाला आहे. मागील दिवसांतील सोन्याच्या किमतीत २.२९ टक्के सरसरी घसरण आहे. चांदीचा भाव ०.५७ टक्क्यांनी कमी होऊन २६.४ डॉलर प्रती औंस झाला आहे.

Must Read

1) Unlock 4: देशातील जनतेला अनलॉक-४ चे वेध; यादीत फक्त निर्बंध असलेल्या गोष्टी!

2) मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, रिपोर्ट पॉझिटिव्ह पण 11287 रुग्णांना लक्षणं नाहीत

3) मुंबईतल्या या 2 ठिकाणी गेली दीडशे वर्ष कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका?

4) दरवाढीला ब्रेक ; पेट्रोल-डिझेलचा हा आहे आजचा दर

हा नियम समजून घ्या; नाही तर द्यावा लागेल ८३ टक्के टॅक्स
२०१९-२० या आर्थिक वर्षात देशात १३.१६ अब्ज डॉलर म्हणजे ९१४४० कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले होते. मात्र यंदा करोना आणि महागाईचा फटका या मौल्यवान धातूंच्या आयातीला बसला. सोने आयातीत एप्रिल ते जुलै(silver and gold rate) या दरम्यान मोठी घसरण झाली. या काळात २.४७ अब्ज डॉलर इतके (भारतीय चलनात १८५९० कोटी) सोने आयात करण्यात आले. त्यात गत वर्षाच्या तुलनेत ८१.२२ टक्के घसरण झाली. दरम्यान सोने आयात कमी झाल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला असून चालू खात्यातील तूट मर्यादित ठेवणे सरकारला शक्य होणार आहे.