Main Featured

खूशखबर : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण


सोने

गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५६१९१ रुपयांवर गेला होता. मात्र त्याला नफेखोरांची नजर लागली. सोन्याच्या दरात शुक्रवारी एक हजारांची घसरण झाली. आज मंगळवारी पुन्हा एकदा सोन्यात(gold rate today) नफावसुली झाल्याने सोन्याचा भाव १०५० रुपयांनी कमी झाला आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५३८९६ रुपयांवर आहे.

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. आज सोने १०५० रुपयांनी घसरले आहे. मागील ३ पैकी २ सत्रांमध्ये झालेल्या घसरणीने सोने २००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीच्या भावात तब्बल ३ टक्के घसरण झाला आहे. बाजारात चांदीचा भाव २४०० रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला ७२९७६ रुपयांवर ट्रेड करत आहे.


इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५४५२८ रुपये आहे. २३ कॅरेटचा भाव ५४३१० रुपये असून चांदीचा भाव एक किलोला ७२३५४ रुपये आहे. सराफांकडून सोन्यावर वस्तू (gold rate today)आणि सेवा कर (GST) , घडणावळ मजुरी (Making Charges) आकारले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याच्या किंमतीत ४ ते ५ हजारांची वाढ होते.

Must read


सोन्याच्या किमतीत सोमवारी ०.३५ टक्क्यांची वाढ झाली होती. त्याच बरोबर चांदीचा भाव २ टक्क्यांनी वाढला होता. सोमवारी चांदी १५०० रुपयांनी महागली होती. भारतातच नव्हे तर जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. डॉलरचे मूल्य वधारत असल्याने मौल्यवान धातूची झळाळी कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोन्यावर कर्ज घेताय ; जाणून घ्या 'गोल्ड लोन'चे व्याजदरकमॉडिटीमध्ये गुंतवणूक करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार, केंद्रीय बँका यांचे सर्व लक्ष सध्या अमेरिकेकडे आहे. अमेरिकेकडून लवकरच करोना संकटावर उपाययोजना म्हणून आर्थिक पॅकेज जाहीर केले जाणार आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाचे पडसाद देखील बाजारावर उमटत (gold rate today)आहेत. त्यामुळे कमॉडिटी बाजारावरील दबाव वाढला आहे. स्पॉट गोल्डच्या किमतीत ०.३ टक्क्यांची घसरण झाली असून सोन्याचा भाव प्रती औंस २०२१.३२ डॉलर झाला. यूएस फ्युचरमध्ये सोने ०.३ टक्क्यांनी स्वस्त होऊन २०३३.६० डॉलर इतका भाब झाला. चांदीच्या दरात देखील १.२ टक्के घसरण झाली असून प्रती औंस भाव २८.८१ डॉलर झाला आहे.

भारतीय 'आत्मनिर्भरता' विसरले; सेल लागताच चीनच्या फोनची तुफान खरेदीजागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत यंदा ३५ टक्के वाढ झाली आहे. मागील सहा महिने जागतिक अर्थव्यवस्थेला करोनाने जखडून ठेवल्याने भांडवली बाजारातील गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे वळत आहेत.(gold rate today)