Main Featured

कोल्हापुरात बाप्पाचं विसर्जन आता तुमच्या दारी! अनोखी विसर्जन पद्धत


Ganeshotsav 2020 Bappa immersion is now doorstep in kolhapur


घरगुती गणपती विसर्जन अवघ्या (Unique immersion method)काही तासांवर येऊन ठेपलं आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळं सर्वच सण उत्सवावर परिणाम झाला आहे. गणेशोत्सव देखील नागरिकांनी अगदी साध्या पद्धतीनं केला. कोल्हापुरात बाप्पाच्या आगमनाला ज्यापद्धतीनं नियोजन करुन गर्दी कमी केली. तशीच व्यवस्था विसर्जनासाठी करणं गरजेच आहे.याचाच विचार करुन कोल्हापुरात अनोखी विसर्जन पद्धत राबण्यात येत आहे.

बाप्पाच्या विसर्जनादरम्यान गर्दी होऊ नये यासाठी विविध उपाय करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरात बाप्पाचं विसर्जन आता तुमच्या दारी अशी मोहिम भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadikआणि रुईकर कॉलनी परिसरातील नगरसेविका उमा इंगळे यांच्या माध्यमातून सुरु केलीय...नागरिकांनी केवळ आपल्या दारात बाप्पाला घेऊन यायचं आहे. संबंधित भक्तांच्या समोरच मूर्ती दान केली  (Unique immersion method)जाईल किंवा काहिलीत बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे.
Must Read

1) Unlock 4: देशातील जनतेला अनलॉक-४ चे वेध; यादीत फक्त निर्बंध असलेल्या गोष्टी!

2) मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, रिपोर्ट पॉझिटिव्ह पण 11287 रुग्णांना लक्षणं नाहीत

3) मुंबईतल्या या 2 ठिकाणी गेली दीडशे वर्ष कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका?

4) दरवाढीला ब्रेक ; पेट्रोल-डिझेलचा हा आहे आजचा दर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं सार्वजनिक ठिकाणी जाऊन बाप्पाचं विसर्जन करणं आता शक्य नाही. अशा वेळी आपली संस्कृती, आपल्या भक्तीभावाचा विचार करुन बाप्पाचं विसर्जन आता तुमच्या दारी हा उपक्रम सुरु केलाय. यामध्ये एका ट्रॅक्टरमध्ये मोठी काहिल असेल. तुम्ही बाप्पाची आरती करुन दारात आल्यानंतर तगेचच हा ट्रॅक्टर तुमच्या दारात येईल आणि तुमच्या समोरच बाप्पाचं काहिलीत विसर्जन केलं जाईल.

लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक, महिला या दरवर्षी बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी नदी घाटावर जात असतात. यंदा मात्र (Unique immersion method) तशी परिस्थिती राहिली नाही. मात्र आपल्या कुटुंबियांच्या समवेत लाडक्या बाप्पाचं विसर्जन करता येणार आहे. अशाच पद्धतीनं संपूर्ण राज्यभर बाप्पाच्या विसर्जनासंदर्भात नियोजन करण्यात आलं तर विसर्जनासाठी होणारी गर्दी आणि त्यामुळं कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव आपल्याला रोखणं शक्य होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊ प्रशासनास मदत करावी, प्रदूषण टाळावं अशापद्धतीचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे.