Main Featured

‘ही’ पेय पिऊन पोटावरील चरबी करा कमी
Effective Weight Loss Drinks

Effective Weight Loss Drinks : वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी दमछाक होते. शरीरावरील वजन अथवा चरबी कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात पण काही उपयोग होत नाही. लवकरात लवकर वजन कमी (weight loss) करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र, त्याचा शरिरावर विपरीत परिणामही होऊ शकतो. प्रत्येकजण नैसर्गिक पद्धतीनं वजन कमी करण्याचा प्रयत्न करुन तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्नशील असतात.

MUST READ

वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक पेय आहेत. पण आज आपण वजन कमी करण्यासाठी घरगुती ड्रिंक्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. ही नैसर्गिक ड्रिंक्स पिल्यास वजन आणि चरबी कमी होण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. पाहूयात अशाच तीन घरगुती ड्रिंक्सबद्दल… फक्त तुम्हाला हे पेय सकाळी उपाशीपोटी करावं लागेल.


weight loss diet
१. जिऱ्यापासून पेय-
पाण्यात जिरं टाकून सेवन करा. जिरं हे एक वेट लॉस फूड आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही पोटवरील चरबी कमी करू
(fast weight loss) शकता. एका संशोधनात असं सांगण्यात आलेय की, जिरं खाल्ल्याने १६ टक्के वजन कमी होऊ शकतं. कारण जिऱ्यामध्ये नॅच्युरल प्लांट केमिकल्स फायटोस्टेरॉल्स असते. जे बॅड कोलेस्ट्रॉलला दूर करण्याचं काम करतं. याने ट्रायग्लिसराइड्सचं विघटन होण्यासही मदत मिळते. ज्यामुळे शरीरात चरबीचं प्रमाण कमी होतं. जिरं सेवन केल्यामुळे पचनक्षमता सुधारते. पेय करण्यासाठी एक चमचा जिरं आणि एक ग्लास पाणी रात्रभर भिजत ठेवावं. त्यानंतर सकाळी पाणी व्यवस्थित गाळून प्यावं.
२. धन्याचे बियाचं पाणी –
धन्याच्या बियांमधील गुणांमुळे वजन घटण्यास फायदा होतो. तसेच या बियांमुळे वजन नियंत्रित करण्यास मदत होईल. धन्यामध्ये मिनरल्स, पोटैशियम, आयरन, मॅग्नीज, कॅल्शियम, फॉलिक एसिड, विटामिन ए, क आणि सी यासरखे विटामिन्स आहेत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक चमचा धन्याच्या बिया पाण्यात टाकून उकळा. हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोठी हे पेय प्यावं. या पेयामुळे तुमच्या शरिरावरील चरबी आणि अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होईल.
3.बडिशेप-
शरीराचा मेटाबॉलिझम वाढविण्यासाठी बडीशेपचा उपयोग होतो. त्यामुळे वजन घटविण्यासाठी हे अतिशय फायदेशीर असते. लठ्ठपणा कमी करुन शरीरयष्टी सुधारण्यासाठी याचा फायदा होतो. बडिशेपच्या बियांचं सेवन केल्यास भूख कमी (fast weight loss) लागते आणि वजन नियंत्रित राहते. एक किंवा दोन चमचे बडिशेपला एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी याचं सेवन करा.