Main Featured

डिजिटल आरोग्य अभियान: आता देशातील प्रत्येक नागरिकाचे बनणार आरोग्य कार्ड



डिजिटल आरोग्य अभियानाची घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (शनिवार) देशातील सर्व नागरिकांसाठी डिजिटल आरोग्य अभियान (Digital Health Mission) सुरू करण्याची महत्वाची घोषणा केली. डिजिटल आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकास एक विशिष्ट आरोग्य ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. हे पाऊल आरोग्य क्षेत्रात पारदर्शकता निर्माण करेल अशी आपल्याला आशा असल्याचे एनडीएच्या या विशेष प्रकल्पात सहभागी झालेल्या अधिका्यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले. (now everyone in country will have health id)

केंद्र सरकार उचलत असलेले हे पाऊल पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे, असे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या अभियानामुळे देशातील आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल होणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या आयडी कार्डात त्याच्या आरोग्याबाबतची सर्व माहिती अंतर्भूत असणार आहे. या अंतर्गत एखाद्या नागरिकाची नोंदणी झाल्यानंतर त्या व्यक्तीला एक यूनिक हेल्थ आयडेंटीटी (UHI) मिळणार आहे. या मुळे रुग्णांद्वारे तसेच डॉक्टरांद्वारे विविध आरोग्य योजनांचा दुरुपयोग केला जाणार नाही, असा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे.
Must Read
डिजिटल आरोग्य अभियान: आता देशातील प्रत्येक नागरिकाचे बनणार आरोग्य कार्ड
'उपचारांच्या नावाने पैसा उकळता येणार नाही'

ही योजना पूर्णपणे लागू करण्यात आल्यानंतर रुग्णालय आणि डॉक्टर उपाराच्या नावावर रुग्णाकडून अधिक पैसे उकळू शकणार नाहीत, असे सू्त्रांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या डॉक्टरने एखाद्या रुग्णाला (now everyone in country will have health id)
अनावश्यक औषधे लिहून दिली, तर त्याची जबाबदारीही निश्चित होणार आहे. कारण औषधे आणि आजार याचे संपूर्ण रेकॉर्ड त्या विशेष क्रमांकाशी जोडला जाणार आहे. या बरोबरच मूल जन्मल्यानंतर त्याचे लसीकरण आणि इतर उपचार याबाबतचा तपशील देखील असशा यूनिक क्रमाकांमध्ये जोडला आहे. या मुळे फाइल्स बाळगणे, रुग्णालयांमध्ये रेकॉर्ड ठेवणे अशी कामे किंवा त्याबाबतच्या समस्या दूर होणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
या योजनेमुळे देशातील आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असल्याचे डिजिटल हेल्थ मिशनला मदत करणारे प्रा. राजेंद्र गुप्ता यांचे म्हणणे आहे.