Main Featured

फडणवीसांचं प्रमोशन? बिहार निवडणुकीची रणनीती आखण्याची जबाबदारी मिळणार


देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात पाच वर्षे भाजपचं सरकार यशस्वीरित्या चालवणारे व मागील निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळवून देणारे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडकडून बक्षीस मिळणार असल्याची (National level promotion) चर्चा आहे. फडणवीसांच्या संघटन कौशल्याचा वापर करून घेण्यासाठी त्यांना बिहारचे प्रभारीपद मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. फडणवीसांचं हे राष्ट्रीय पातळीवरील प्रमोशनच असल्याचं बोललं जात आहे.


बिहार भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला फडणवीस यांनी अलीकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्यानंतर बिहारमध्ये त्यांना जबाबदारी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. सुशांतसिंह प्रकरणावरून महाराष्ट्र व बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाचीNational level promotion) किनारही या नियुक्तीला असल्याचं बोललं जातं. या वादाचा भाजपला कुठेही फटका बसू नये, याची खबरदारी फडणवीस घेतील अशी अपेक्षा भाजप नेतृत्वाला आहे.

बिहारमध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भाजपच्या आघाडीचं सरकार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार मोठ्या भावाच्या भूमिकेत असले तरी तिथे आपलं स्थान आणखी मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. फडणवीस ते काम करू शकतात, असा विश्वास भाजप नेतृत्वाला आहे.
Must Read

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील युती सरकारचा कारभार सक्षमपणे हाताळला होता. मित्र पक्ष शिवसेनेला सांभाळतानाच विरोधकांंनाNational level promotion)फारशी संधी मिळू दिली नव्हती. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यांचं संघटन कौशल्य बिहारमध्ये पक्षाला फायद्याचं ठरेल, असा विश्वास भाजप नेतृत्वाला वाटतो.