Main Featured

आणि रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीनेच घेतला दुकानदाराचा चावा!


....आणि रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीनेच घेतला दुकानदाराचा चावा!

 राजकारणी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कहाण्या या कायम चर्चेत असतात. अशाच एका घटनेने बिहारमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (Bihar Deputy Chief Minister Sushilkumar Modiयांच्या बहिणीने रागाच्या भरात एका रेशन दुकानदाराचाच चावा घेतल्याची घटना घडली आहे. रेखा मोदी असं त्यांच नाव आहे. रेखा यांनी एका स्थानिक दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ विकत घेतला. आणि त्यांना ती पोती घरी आणून देण्यास सांगितलं.
त्यानंतर त्या दुकानदाराने तो माल काही घरी आणूनच दिला नाही. त्यामुळे रेखा या त्या दुकानदाराकडे गेल्या आणि ही घटना घडली. ‘जनत्ता’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
तांदुळ घरी का आणून दिला नाही असा सवाल त्यांनी दुकानदाराला केला तेव्हा त्यांने काही समाधानकारक उत्तर दिलं नाही असं त्यांनी सांगितलं. नंतर त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर त्यांच्यात भांडण झालं आणि भांडणामुळे रागाने रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला.
Must Read 
शेवटी प्रकरण पोलिसांमध्ये गेलं. पोलीस स्टेशनला गेल्यावरही रेखा मोदी यांनी प्रचंड गोंधळ घातला. जमीनीवर झोपून त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. शेवटी पोलिसांनी दुकानदाराला रेखा यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिलेत.