Main Featured

रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत?Deepika padukone  and  ranbir kapoor

अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियाद्वारे ती बॉलिवूडमधील घराणेशाही आणि एकाधिकारशाहीवर जोरदार टीका करत आहे. यावेळी तिने अभिनेता रणबीर कपूर आणि आभिनेत्री दीपिका पदुकोणवर (Deepika padukone Instagram)निशाणा साधला आहे. हे कलाकार देखील सतत आपल्या मानसिक आजारांचं भांडवल करत असतात पण त्यांना कोणी रुग्ण म्हणत नाही. असा टोला तिने लगावला आहे.


MUST READ
नेमकं काय म्हणाली कंगना?

“रणबीर कपूर (Ranbir Kapoor)हा एक सीरियल स्कर्ट चेसर आहे. पण कोणीही त्याला बलात्कारी म्हणण्याची हिंमत करत नाही. दीपिका स्वयंघोषित मानसिक रुग्ण आहे, पण कोणीही तिला सायको म्हणत नाही. मात्र सामान्य कुटुंबातून आणि लहान शहरांमधून आलेल्या नव्या कलाकारांचं मात्र नामकरण केलं जातं.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने रणबीर आणि दीपिकावर (Deepika padukone Instagram)निशाणा साधला. तिनं हे ट्विट आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी कंगना आयुषमान खुरानामुळे चर्चेत होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिने आयुषमानवर टीका केली होती. “चापलूस आउटसायडर्स केवळ एका कारणाने माफिया लोकांना पाठिंबा देत आहेत अन् ते कारण म्हणजे त्यांची विचार करण्याची सामान्य पद्धत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही धमकावत नाही. त्यामुळे या गोष्टीचा ते फायदा घेत आहेत.” अशा आशयाचं ट्विट तिने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन केलं होतं.