hasan mushrif

Indian politics- राज्यात कोणतीही मोठी घटना घडली की मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची घाई नसते. परंतु राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाच घाई असते. निष्ठा दाखवण्याची केविलवाणी धडपड मुश्रीफ नेहमी करत असतात. त्यांना आ बैल मुझे मार अशी सवय लागली आहे. अशी खरमरीत टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पलटवार केला आहे.


Must Read


Indian politics- प्रसिद्धी पत्रकाद्वारे पलटवार


पाटील पुढे म्हणाले की, २०१४ ते १९ या काळात आमचे सरकार सत्तेत होते. यावेळी बदल्यांमध्ये घोटाळा झाला अशी टीका मुश्रीफांनी केली. त्यांना इतक्या उशिरा का जाग आली. त्यांनी त्याचवेळी याला विरोध करायला हवा होता. त्यांनी आधी २०२० मध्ये झालेल्या बदल्यांची चौकशी करावी. याचबरोबर मुश्रीफांना काय चौकशी करायची आहे ती खुशाल करावी. आम्ही जनतेसाठी मोठी कामे केली तुम्हाला ती झोंबतात का? अशीही टिका पाटील यांनी केली.

सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, स्वॅबच्या रिपोर्टमध्ये गोंधळ असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत मंत्री मुश्रीफ काहीही बोलत नाहीत. पण राज्यपातळीवर घडणाऱ्या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचं बंद करावे असे पाटील म्हणाले.