Main Featured

धक्कादायक! वडील झोपेत घोरत होते म्हणून आला राग, मुलाने बापालाच पाठवलं मृत्यूच्या दारात


धक्कादायक! वडील झोपेत घोरत होते म्हणून आला राग, मुलाने बापालाच पाठवलं मृत्यूच्या दारातआपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या बापालाच मुलाने लाठी-काठीने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री झोपेत वडील घोरत होते. त्यावरून मुलात आणि वडिलांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की यामध्ये वडिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. वडिलांचा मृत्यू झाला हे लक्षात येताच आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हे प्रकरण सेरमाऊ उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातील सौधा या गावचं आहे. जिथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एका राक्षसी मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केली आहे. 65 वर्षांचे रामस्वरूप हे पत्नी आणि दोन मुलं नवीन आणि मुकेश यांच्यासमवेत सौधा गावात राहत होते. घटनेच्या वेळी लहान मुलगा मुकेश त्याच्या आईसोबत कार्यक्रमाला गेला होता.ऐवढ्यात मोठा मुलगा नवीन याचा त्याच्या वडिलांशी वाद सुरू झाला. मंगळवारी रात्री नवीन आणि रामस्वरूप घरी एकटेच होते. रात्री झोपताना वडिलांच्या घोरण्यावरून नवीनने पुन्हा वाद सुरू केला आणि नंतर रागाच्या भरात काठीने मारहाण करत वडिलांची हत्या केली.
घटनेनंतर नवीन फरार आहे. ही माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने वडिलांना उपचारासाठी सीएचसी इथे नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत जखमी वडिलांचा वाटेतच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मृत्यूची बातमी समजताच कुटुंबात अराजकता पसरली आहे.दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणावर तपास सुरू केला असून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.