Main Featured

COVID-19: राज्यात 331 जणांचा मृत्यू, नव्या रुग्णांचीही पुन्हा एकदा उच्चांकी भरराज्यात शुक्रवारी पुन्हा एकदा 14 हजार 364  नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 14 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये 331 जणांची भर पडली आहे. तर 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू दर हा 3.16 टक्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली आहे.
राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी सादर करावीत असं सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्या सूचनांच्या आधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
मुंबईतील जिम चालकांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जिम सुरु करतांना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे.


यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 77 हजार 266 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशात एकूण 33 लाख 87 हजार 501 कोरोना रुग्ण आहेत. तर, 7.45 लाख रुग्ण अॅक्टिव्ह असून 25.8 लाख रुग्ण निरोगी झाले आहेत. गेल्या 24 तासांत 60 हजार रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत.