Main Featured

कोल्हापुरात ‘कोव्हॅक्सिन’ चाचणी ४ सप्टेंबरपासून!

Kolhapur

Kolhapur- वाढत्या कोरोना (coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय ‘कोव्हॅक्सिन’ या लस चाचणीच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्याला कोल्हापुरात 4 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. नियोजनानुसार हे काम 20 सप्टेंबरपूर्वी संपविण्याचे नियोजन आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार ‘कोव्हॅक्सिन’(covaxin) बाजारात उपलब्ध होण्यास मार्च 2021 उजाडेल, असे गणित मांडण्यात येते आहे.
तथापि, देशातील वाढता संसर्ग, निष्पापांचे जाणारे बळी आणि रखडलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर भारताने चीन, रशियाप्रमाणे प्रोटोकॉलमध्ये सवलत घेतली, तर डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात ‘कोव्हॅक्सिन’ (covaxin) बाजारात उपलब्ध होऊ शकते, असे मत वरिष्ठ वैद्यकीय वर्तुळामध्ये व्यक्त केले जाते आहे.


Must Readभारतानेही विचार केला, तर नववर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी भारतात कोरोनावरील लस उपलब्ध होऊ शकते. अर्थात, ‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीच्या सर्व कसोट्यांवर यशस्वी होणे आवश्यक आहे.