Main Featured

अखेर कोरोना लशीची तारीख ठरली!Coronavirus vaccine

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 1, कोटी 77 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 6 लाख 82 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी कोरोनावर लस (Coronavirus vaccine)अद्याप मिळालेली नाही आहे. 

Must Read
सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारत यासंह अनेक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. एकीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या (oxford university) लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. तर, रशियाने आता थेट सार्वजनिक लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. कारण ऑगस्ट अखेरीस कोरोनाची लस (Coronavirus vaccine) देण्याचा विचार रशिया करत आहे.
रशिया देशातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे. रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी म्हटले आहे की एका महिन्यासाठी 38 लोकांची पहिली चाचणीही या आठवड्यात पूर्ण झाली. ही लस वापरण्यास सुरक्षित आहे आणि रोग प्रतिकारशक्ती देखील विकसित करीत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. ऑग्सटमध्ये रशियाला व सप्टेंबरमध्ये इतर देशांमध्ये या लसीच्या उत्पादनाचे काम सुरू होईल.

14 ऑगस्ट दरम्यान लस 'सिव्हिल सर्कुलेशन' मध्ये

रशियाची गमलेई लस पाश्चात्य देशांपेक्षा वेगाने वाढत आहे. या लसीची फेज 3चा ट्रायलही सुरू आहे. रशिया, सौदी अरेबिया आणि युएई मधील हजारो लोक यात सहभागी होत आहेत. असा विश्वास आहे की सप्टेंबरपर्यंत रशिया कोरोना व्हायरस लस तयार करेल. गॅमलेई सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी सरकारी एजन्सी TASS सांगितले की, 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान ही लस 'सिव्हिल सर्कुलेशन' मध्ये असेल अशी त्यांची अपेक्षा आहे. अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपासून खासगी कंपन्या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करतील.