Main Featured

Covaxin च्या पहिल्या ट्रायलचा निकाल आला, नागपूरातील 68 रुग्णांना डोस दिल्यानंतर झाली अशी अवस्था


Covaxin च्या पहिल्या ट्रायलचा निकाल आला, नागपूरातील 68 रुग्णांना डोस दिल्यानंतर झाली अशी अवस्था

देशभरात कोरोना वॅक्सिन संदर्भात (Coronavirus Vaccine India) ट्रायल आणि शोध सुरू असताना आता एक चांगली बातमी आली आहे. भारत बायोटेकद्वारे (Bharat Biotech) तयार केलेल्या लशीच्या तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारत बायोटेकद्वारे बनविल्या जाणाऱ्या Covaxin च्या दुसऱ्या टप्प्याच्या तपासणीची तयारी केली जात आहे. या दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांची ओळख पटविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असा विश्वास आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ट्रायलला सुरूवात होईल.
दिल्लीतील AIIMS वगळता भारत बायोटेकनं लशीच्या इतर 11 केंद्रांनी ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण केली आहे. एम्स दिल्लीने लसीच्या मानवी चाचणी टप्प्यासाठी केवळ 16 लोकांना निवडले आहे.
Must Read
सुरुवातीला AIIMS दिल्लीला लस चाचणीसाठी  (Coronavirus Vaccine India)100 उमेदवारांची नोंद करावी लागली. 12 केंद्रांवर चालविल्या जाणाऱ्या भारत बायोटेकच्या चाचण्यांसाठी 375 जणांची निवड झाली आहे. इंडिया टुडेच्या अहवालानुसार एम्सच्या सूत्रांनी सांगितले की, मानवी चाचणीचा दुसरा टप्पा कदाचित सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. फेज 1 चा ट्रायलबाबतचा निकाल लवकरच सांगितला जाऊ शकतो.

नागपूर ट्रायल सेंटरमध्ये फेज 1 पूर्ण
रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातील नागपूर चाचणी केंद्रात पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि 55 लोकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, "पहिल्या डोसनंतर तापाची लक्षणे दोन रूग्णांमध्ये आढळली. मात्र काही तासांच्या तपासणीनंतर औषध न घेता तो बरा झाला." दोन दिवसांपूर्वी सात जणांना दुसरा डोसही देण्यात आला होता. गुरुवारी आणखी 13 लोकांना Covaxinचा दुसरा डोस देण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, नागपूर केंद्राने भारत बायोटेकलाही फेज 1 मानवी चाचण्यांच्या परिणामांची माहिती दिली.
सीरम इन्स्टिट्यूटही लवकरच देणार लस
दरम्यान, भारताची आणखी एक कोरोना लस फेज 2 आणि 3च्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) यांना  (Coronavirus Vaccine India)ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका विद्यापीठाने तयार केलेली लस इंडिया COVISHIELD ला फेज 2 आणि 3 चाचणी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. आहे. एसआयआय दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत मानवी चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहे.