Main Featured

साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तवरशियाची कोरोनावरील लस यशस्वी ठरली असल्याची घोषणा करून रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी काल (President Vladimir Putin) संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जगाला या लसीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता या लसीबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीबाबत डेली मेलने रशियाच्या अधिकृत कागदपत्रांच्या हवाल्याने ही माहिती उघड केली आहे. त्यानुसार रशियाने विकसित केलेल्या कोरोनावरील या लसीची चाचणी केवळ ३८ जणांवरच करण्यात आली. तसेच या लसीचे अनेक दुष्परिणामही दिसून आले, असा दावा डेलीमेलने आपल्या वृत्तात केला आहे. तसेच केवळ ३८ जणांवर चाचणी केल्यानंतर या लसीला मान्यता देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.(President Vladimir Putin)
Fontanka या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन संशोधकांनी विकसित केलेल्या कोरोना लसीचे अनेक दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेदना, स्वेलिंग, ताप असे परिणाम दिसून आले आहेत. तसेच ज्यांना ही लस देण्यात आली त्यांच्यामध्ये कमकुवतपणा, शरीरात ऊर्जेची कमतरता, भूक न लागणे, डोकेदुखी, जुलाब, नाक कोंडणे, घसा खराब होणे आणि नाक गळणे अशी लक्षणे दिसून आली.
Must Read

रशियन अधिकाऱ्यांनी केवळ ४२ दिवसांच्या संशोधनानंतर या लसीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लस कितपत परिणामकारक आहे, हे समजू शकलेले नाही.
कोरोनाच्या साथीवर या लसीच्या परिणामाबाबत कुठलाही वैद्यकीय अभ्यास झाला नसल्याचे या लसीची नोंदणी करताना दिलेल्या कागदपत्रात म्हटले होते. मात्र पुतीन यांनी कोरोनावरील या लसीने आवश्यक त्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत.
रशियाने आपल्या लसीचे नाव स्पुटनिक - V ठेवले आहे. तसेच या लसीचा अनेक देशांना पुरवठा करण्याची तयारीदेखील रशियाकडून करण्यात आली आहे. मात्र जगभरातील अनेक संशोधकांनी रशियाने उचललेल्या या पावलावर टीका केली आहे. ही लस चुकीची किंवा धोकादायक ठरल्यास साथ अधिक गंभीर रूप धारण करू शकते अशी भीती संशोधक व्यक्त करत आहेत.(President Vladimir Putin)
दरम्यान, कोरोनावरील ही लस घेतल्यानंतर आपल्या मुलीला काही काळासाठी केवळ सौम्य ताप आला होता, असे पुतीन यांनी सांगितले. मात्र Fontanka या वृत्तसंस्थेच्या म्हण्यानुसार कोरोनावरील लसीचे दुष्परिणाम म्हणून अनेक प्रकारच्या समस्या उदभवू शकतात. या समस्यांची शरीरामध्ये पुनरावृत्ती होते आणि अनेकवेळा त्या कायम राहतात.
याबाबतच्या अहवालानुसार या(President Vladimir Putin) कोरोना लसीमुळे होणारे बहुतांश दुष्परिणाम आपोआप बरे झाले. मात्र संशोधनाच्या ४२ दिवशीही दुष्परिणामांच्या ३१ घटना समोर आल्या होत्या. तसेच ही लस टोचल्यानंतर ४२ व्या दिवशीही स्वयंसेवकांच्या शरीरामध्ये अँटिबॉडीचे प्रमाण सामान्यच दिसून आले.
दरम्यान, १८ वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना रशियाने विकसित केलेली कोरोनावरील लस देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण् अशा व्यक्तींवर या लसीचा काय परिणाम होऊ शकतो, हे अद्याप समोर आलेले नाही.
तसेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनासुद्धा ही लस देण्यात येणार नाही. तसेच आधीपासूनचा आजारांचा सामना करत असलेल्या व्यक्तींनाही ही लस देण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.