Main Featured

पुणे जिल्ह्याला करोनातून दिलासा मिळण्याची चिन्हे! दिवसेंदिवस रुग्णसंख्येत घट


पुणे Pune शहरात दिवसभरात पाच हजारांहून अधिक चाचण्या करुनही केवळ ७६१ जणांना लागण झाली. तर जिल्ह्यात १८०६ जणांना लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटल्याचे दिसते. त्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांच्या संख्येत भर पडत असून मृतांचा आकडा कमी होत नसल्याचे चिंता वाढली आहे. तर दिवसभरात शहरात १४९९ जणांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत शहरातील ५० हजार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शहरात ५१३३ जणांची चाचणी घेण्यात आल्या असून त्यापैकी ७६१ जणांना लागण झाल्याचे निदान झाले. मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्यानंतरही पहिल्यांदाच पुण्यातील रुग्णसंख्या गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत सोमवारी घसरल्याचे दिसून आले आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, पुणे कँटोन्मेंट बोर्ड तसेच नगरपालिकांमध्ये हीसंख्या घटल्याचे दिसते. शहरात ७३८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी ४४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २९४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. २४१७ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याने त्यावरील रुग्णांच्य़ा संख्येत वाढ होत आहे.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाखांवर

एकूण रुग्णसंख्येचा आकडा ५ लाख २४ हजार ५१३ इतका झाला आहे. राज्यात करोना रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढत आहे. तब्बल ६ हजार ७११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं करोनावर यशस्वी मात केलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ५८ हजार ४२१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के इतके झाले आहे. त्यामुळं करोनाच्या संकटात हा आकडा थोडा समाधानकारक आहे. सध्या राज्यात १० लाख ०१ हजार २६८ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ४७ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहेत.