Main Featured

…तर मुंबईत लोकल रेल्वे वाहतूक सुरु करु, मध्य रेल्वेची माहिती
करोना संकटामुळे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल रेल्वे  (Mumbai Local Railway) सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक (Central Railway Information)कार्यालयं सुरु झाली असून कर्मचाऱ्यांना बसने प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनाही लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप मुंबईत लोकल रेल्वे वाहतूक सुरु करण्यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान मध्य रेल्वेने राज्य सरकारने परवानगी दिल्यास रेल्वे सुरु कऱण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.
मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने परवानगी दिल्यास आम्ही मुंबईत लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी तयार आहोत असं म्हटलं आहे. राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करू असंही ते म्हणाले आहेत.

Must Read


कार्यालयीन वेळा बदलांसाठी रेल्वे प्रशासन आग्रही
करोनाकाळात शारीरिक अंतराचे नियम अबाधित ठेवून प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेप्रवास सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, लोकल रेल्वेसाठी होणारी प्रवाशांची गर्दी पाहता, मुंबईतील कार्यालयांच्या वेळांमध्ये (Central Railway Information)बदल करण्याची गरज निर्माण होणार आहे. याबाबत रेल्वेने पुढाकार घेतला असून लवकरच या मुद्यावर राज्य सरकार, महापालिका यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याआधी जूनमध्ये रेल्वे प्रवासातील ठराविक वेळेस होणारी गर्दी कमी व्हावी म्हणून सरकारी व खासगी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत राज्य सरकार, पालिका व रेल्वे प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत चर्चा झाली होती. काही महिन्यानंतर सामान्यांसाठीही लोकल सुरू करायची झाल्यास ठराविक वेळेस होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याशिवाय पर्याय नसेल. एकत्रित बैठकीत तसा निर्णय झाल्यास रेल्वे (Central Railway Information)त्या दृष्टीने तयारी सुरू करेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सत्याकु मार यांनी दिली होती.
भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाययोजना
– लोकल फे ऱ्या पूर्ववत करणार
– रेल्वे स्थानकात मोजके च प्रवेशद्वार आणि प्रवेशावर नियंत्रण
– स्थानकात आणि लोकल गाडय़ात शारीरिक अंतर राखण्याचा प्रयत्न
– यासाठी लवकरात लवकर कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी प्रयत्न
– बदललेल्या कार्यालयीन वेळांनुसार लोकलचे वेळापत्रकही बदलणार