Main Featured

भाजी विक्रेत्यांची सोमवारपासून कोरोना तपासणी, महापालिकेची मोहिम


Corona inspection of vegetable sellers from Monday, municipal campaign | भाजी विक्रेत्यांची सोमवारपासून कोरोना तपासणी, महापालिकेची मोहिम


 शहरातील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक असणार आहे. महापालिकेच्या वतीने मंडईमध्ये जाऊन लाऊडस्पीकरने विक्रेत्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यास शुक्रवारपासून सुरू केले. याचबरोबर सोमवार (दि. १७) पासून प्रत्येक मंडईमध्ये विक्रेत्याची तापाची आणि ऑक्सिजनची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कोरोनाचे लक्षण असणाऱ्यांना तातडीने स्राव तपासणी करण्यासाठी पाठवले जाणार आहे.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेकडून साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील सर्व भाजीविक्रेत्यांची ॲन्टिजेन टेस्ट करून घ्या, असे आदेश दिले. यानुसार इस्टेट विभाग, मार्केट ऑफिसर, अतिक्रमण निर्मूलन पथक विभाग यांनी याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मार्केट विभागाकडून शहरातील १६ मंडयांमध्ये सोमवारपासून विक्रेत्यांची आरोग्य तपासणी सुरू केली जाणार आहे. यामध्ये सर्वांची तापाची तपासणी, ऑक्सिजनची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये लक्षण असणाऱ्यांना तातडीने स्राव तपासणीसाठी आयसोलेशन किंवा सीपीआरमध्ये पाठवले जाणार आहे. दुकानदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चेंबर ऑफ कॉमर्सलाही सूचना दिल्या आहेत.