Main Featured

छत्तीसगडच्या जंगलात मुसळधार पावसामध्ये थरार, चकमकीत 4 माओवाद्यांचा खात्मा


छत्तीसगडच्या जंगलात मुसळधार पावसामध्ये थरार, चकमकीत 4 माओवाद्यांचा खात्मादेशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगड (Chhattisgarh) आणि गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी डोके वर काढले आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत चार माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे.छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) जिल्ह्याच्या जंगलात ही घटना घडली आहे. जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांच्या झालेल्या चकमकीमध्ये चार माओवाद्यांचा खात्मा झाला आहे. काही बंदुकां आणि  शस्त्र साठ्यासह चार मृतदेह घटनास्थळी सापडले आहे. यामध्ये दोन माओवादी वेशातील आणि 2 ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. जंगलात पाऊस सुरू असताना जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. जवानांनी माओवाद्यांना जशास तसे उत्तर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जवान अजूनही जंगलात असून शोधकार्य सुरू आहे.कोब्रा 201 सीआरपीएफ 223 आणि डीआरजीच्या जवानांनी संयुक्तपणे ही शोध मोहिम सुरू केली होती. याच दरम्यान त्यांचा सामना हा माओवाद्यांशी झाला. माओवाद्यांनी जवानांना पाहून त्यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर जवानांनी जशास तसे उत्तर देत 4 जणांना ठार मारले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांकडे 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणात बंदुकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुकमाचे एसपी शलभ सिन्हा यांनी बातमीला दुजोरा दिला आहे.जिल्ह्यातील चिंतलनार भागात सुरक्षा दलाचे जवानांनी शोधमोहिम सुरू केली तेव्हा ही घटना घडली. जगरगुंडा भागातही चकमक झाली असून जवान जेव्हा जंगलातून बाहेर येतील तेव्हा संपूर्ण माहिती दिली जाईल, असं सिन्हांनी सांगितलं.