Main Featured

ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली शुल्कवसुलीCharges under the name of online classes | ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली शुल्कवसुली

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालय बंद आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस घेण्यास सुरू केले आहे. ठराविक वेळेत व्हाट्सअप, झूम, मोट व वेबेक्स या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. पालकांना शुल्क वसुलीचा तगादा लावू नये, असे शासनाचे निर्देश असूनही ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याचे कारण पुढे कडून शाळेकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे.
शाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी त्यांचासमोर शुल्क वसुलीचा पेच निर्माण झाला आहे. 
राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार कुठल्याही खासगी शाळांना पालकांना शुल्क वसुली करता तगादा न लावण्याचा आदेश असूनसुद्धा शासनाच्या नियमांना धाब्यावर ठेवून खाजगी शाळेतर्फे ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली पालकांना शुल्क भरण्याकरता मेसेज पाठवण्यात येत आहे. अनेक शाळांतर्फे पूर्ण फी भरल्यास दहा टक्के सूट देण्याची ऑफरसुद्धा देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अनेक पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना खासगी शाळांना शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे.पालक शुल्क भरण्यास तयार आहेत. मात्र शाळा व कॉलेज बंद असल्यामुळे खासगी शाळांचे अनेक खर्च कमी झाले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने खासगी शाळांनी कमी शुल्क आकारावे.