Main Featured

कोल्हापूरचा अपमान सहन केला जाणार नाही

kolhapur

स्वत:च्या जाहिरातीसाठी कोल्हापूरची (kolhapur)बदनामी करणाऱ्या एशियन पेंटस्‌ कंपनीने जाहीर माफी मागावी, अन्यथा हिसका दाखवण्याचा इशारा देत शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. दरम्यान, कंपनीने यूट्यूबवरील (YouTube) ती अवमान करणारी जाहिरात रद्द केली.


संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.  धनाजी दळवी, रमेश खाडे, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, अमित चव्हाण, अजित गायकवाड, विशाल देवकुळे, राहुल चव्हाण, राजू काझी, सुरेश कदम, सनी अतिग्रे, अश्विन शेळके, गजानन भुर्के, मंदार तपकिरे, सचिन भोळे, नीलेश हंकारे, पियूष चव्हाण उपस्थित होते.


Must Readएशियन पेंट्‌सने (asian paints) केलेल्या जाहिरातीत कोल्हापूरचा (kolhapur) उल्लेख उपोरोधिक करून कोल्हापूरची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. आम आदमी पार्टीने एशियन पेंट्‌स कंपनीच्या मालकांना पत्र लिहून कोल्हापूर पाहण्यास येण्याचे निमंत्रण दिले. जाहिरात बनवणाऱ्या टीमला कोल्हापूरची सैर करण्यासाठी ‘आप’तर्फे तिकिटांची सोय करणार असल्याचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले. दरम्यान पुढचा भाग म्हणून त्यांनी कोल्हापुरातील चित्रनगरीत चित्रीकरण करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी लागणारे सर्व कलाकार, तांत्रिक सहायक, आयटीमधील इंजिनियर आमच्याकडे आहेत, असे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

एशियन पेंटस्‌ (asian paints) कंपनीने जाहिरातीमधून शाहूनगरीचा अवमान केला. आमदार ऋतुराज पाटील यांनी निषेध नोंदवत कंपनीला जाहिरात मागे घेऊन माफी मागण्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर युवक काँग्रेस आणि एनएसयुआयतर्फे छत्रपती शिवाजी चौकात कंपनीविरोधात निदर्शने केली. रंगाचे डबे गटारीत ओतून कंपनी जाहिरात मागे घेऊन माफी मागत नाही. तोपर्यंत एकही डबा विकू देणार नाही, असे युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक थोरात यांनी सांगितले. उदय पोवार, विनायक पाटील, पार्थ मुंडे, अक्षय शेळके, वैभव देसाई, सत्यजित शेजवळ, चंद्रकांत लोंढे, सागर चौगुले, उमेश पाडळकर, रोहित गाडीवडर, आनंदा करपे उपस्थित होते.