Main Featured

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी, ३५ कोटींच्या खंडणीची केली मागणी


दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी, ३५ कोटींच्या खंडणीची केली मागणी

बॉलीवूडमध्ये सध्या अनेक खळबळजनक गोष्टी घडताना दिसत आहेत. बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचं नातं अनेकदा सिनेमातून उलगडण्यात आलं आहे. मात्र असंच काहीसं आता घडलंय ते अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Actor-director Mahesh Manjrekar) यांच्या बाबतीत. महेश मांजरेकर मराठी सिनेसृष्टीसोबतंच बॉलीवूडमध्येही तितकेच सक्रिय आहेत. सलमान खान आणि त्यांचं नातं देखील फार जवळंच असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या हत्येचा कट रचणा-या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आणि आता सलमान खान खान नंतर त्याची चांगली आणि जवळची मैत्री असलेल्या महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्ड कडून धमकी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. 

Must Read


अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचं कळतंय. अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमच्या नावाने महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. खंडणी स्वरुपात त्यांच्याकडून तब्बल ३५ कोटींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याचंही कळतंय.