Main Featured

viral video : जेव्हा सलमान छायाचित्रकारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यास सांगतो...


Salman Khan family photos | Celebrity family wiki

कुटुंबासमवेत गणेशोत्सव साजरा करणारा भाईजान सलमान खान (Salman Khan) यानं कोरोना प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी सुरुवातीपासूनच कमालीची काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे स्वत:सोबतच आता तो इतराच्या काळजीपोटीसुद्धा आग्रही असल्याचं दिसत आहे. बरं तेसुद्धा एका खास आणि हचके अंदाजात. 
सोशल मीडियायवर सध्या व्हायरल होणाऱा सलमानचा व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये सलमान त्याच्यासमोर उभ्या असणाऱ्या छायाचित्रकारांना सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यास सांगताना दिसत आहे. वूंपला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला चाहत्यांनी कमालीची पसंती दिली आहे


गणपती विसर्जनाहून येताच छायाचित्रकार या व्हिडिओमध्ये सलमानची एक झलक टीपण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्यातील उत्साह पाहत, या परिस्थितीतही त्यांना सोशल डिस्ट्न्सिंगचं पालन करण्याचा सल्ला देताना सलमान दिसत आहे. इतक्यावरच न थांबता सलमान या व्हिडिओमध्ये स्वत:च्या मोबाईलमधून छायाचित्रकारांचीच झलक टीपताना दिसत आहे. भाईजानचा हा अंदाज पाहून माध्यमांच्या प्रतिनिधींमध्येही एकच हशा पाहायला मिळाला.