Main Featured

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन राबवणार : जिल्हाधिकारी दौलत देसाई


इचलकरंजी शहरातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. तर शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण मिळून येत असलेल्या तांबे मळा, लालनगर, कलावंत गल्ली व गावभाग या चार भागामध्ये घर टु घर सर्व्हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाचे सतराशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांनी आज इचलकरंजीत भेट देऊन प्रांतकार्यालयात अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीस प्रांताधिकारी विकास खरात, तहसिलदार प्रदीप उबाळे, नायब तहसिलदार एम.एम. सनदे, मुख्याधिकारी दिपक पाटील, आयजीएमचे आर.आर. शेट्टे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत आढावा घेऊन संबधित अधिकार्‍यांना सुचना केल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, शहर परिसरातील वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी नव्याने टिम करण्यात आली असून त्यांच्या मार्फत बाधीत रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर योग्यवेळी उपचार केले जावेत यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

होम आयसोलेशन झालेल्यांची दररोज डॉक्टरांकडून मॉनेटरींग करण्याबरोबरच संबंधित रुग्ण घराबाहेर पडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून फलक लावण्याची सुचना करण्यात आली आहे. इचलकरंजीबरोबरच कोरोची, कबनुर, चंदुर, यड्राव या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने खबरदारीसाठी स्थानिक प्रशासनाने योग्य उपाययोजना, तसेच नगरपालिका हद्दीत पालिका प्रशासनाने उपाययोजना राबवून त्यामध्ये प्रांताधिकार्‍यांनी समन्वय साधण्याबाबत सुचना केल्या. आयजीएम रुग्णालयातील 42 कर्मचार्‍यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत सुचना केल्या असून त्यांनी काम करण्यास नकार दिला तर त्यांचे समावेशन न करण्याबाबतचा इशाराही त्यांनी दिला.