Main Featured

विद्यार्थ्यांनी अडवली अब्दुल सत्तारांची गाडी, पोलिसांच्या अमानुष लाठीचार्जचा VIDEO समोर


विद्यार्थ्यांनी अडवली अब्दुल सत्तारांची गाडी, पोलिसांच्या अमानुष लाठीचार्जचा VIDEO समोर


विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( ABVP) कार्यकर्त्यांनी बुधवारी धुळ्यात आंदोलन केलं. यादरम्यान विद्यार्थ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली असता पोलिसांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या देखत अमानुष लाठीचार्ज केला.

गेल्या पाच महिन्यांत कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राजीनामा द्यावा, मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच प्रवेश फी 30 टक्के कमी घ्यावी, परीक्षा शुल्क परत करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
या दरम्यान, धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार (Guardian Minister Abdul Sattar) यांच्या वाहनाचा ताफा अभाविपने अडवला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थी कार्यकर्त्यांवर अमानूष लाठीचार्ज केला. अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी केला आहे.
भाजप आमदाराचं ट्वीट...
आता भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देखील ट्वीट केले असून, मारहाण करणाऱ्या धुळे पोलिसांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. “धुळे पोलीसांच्या गुंडागर्दी चा निषेध करावा तितका कमीच आहे. पालकमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली नाही म्हणून विद्यार्थ्यानी पालकमंत्र्यांची गाडी अडवली यावर पोलीसांनी आशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण केली.पोलीसावर कारवाई व्हावी,' असे ट्वीट आमदार राम सातपुते यांनी केलं आहे.