Main Featured

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कवडीचीही किंमत नसल्याची नेत्यांना खात्री : भाजपा
“भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावं. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखवणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करीत आहेत,” असं म्हणत भाजपा नेते आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Must Read
“केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे . याउलट महाविकास आघाडी सरकारने राज्यात एका कवडीचेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा खरंच कळवळा असेल तर काँग्रेस नेत्यांनी भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून गरिबांसाठी पॅकेज जाहीर करायला भाग पाडावे. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखविणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत, आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही, हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करीत आहेत,” असे उपाध्ये म्हणाले.