Main Featured

महिलेवर एक्स बॉयफ्रेंडने केला बलात्कार


महिलेवर एक्स बॉयफ्रेंडने केला बलात्कार; व्हिडिओ केला व्हायरलअश्लील चित्रफित व्हायरल करून युवकाने ३३ वर्षीय 33-year-old  महिलेवर अत्याचार Tyranny केला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी पांडुरंग हरीशचंद्र पारगावे (रा. लातुर) याच्याविरुद्ध अत्याचार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला भंडारा येथील रहिवासी आहे. २०१५मध्ये तिचे पांडुरंग याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पांडुरंगने त्याची मोबाइलने चित्रफित काढली. महिलेचे लग्न झाले. तिचा मुलगा हा लातूर येथे राहायला लागला. याबाबत पांडुरंगला कळले. त्याने महिलेच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला. मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. शारीरिक संबंधाची चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली.

पांडुरंगने महिलेला रामटेकला बोलाविले. येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेला सतत ब्लॅकमेल करायला लागला. याचदरम्यान पांडुरंग याने पीडित महिलेच्या नातेवाइकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर अश्लील चित्रफित पोस्ट केली. महिलेला याबाबत कळले. तिने पतीसह रामटेक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पांडुरंग याचा शोध सुरू केला आहे.