Main Featured

JioMart च्या नावाखाली होतेय फसवणूक


जिओमार्टची (Jio mart)फ्रेंचाइजी देण्याच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने याची दखल घेतली असून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिओमार्टच्या नावाने फेक वेबसाइट बनवून फ्रेंचाइजी किंवा डीलरशिप देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन रिलायन्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आलं आहे.

“आम्ही सध्या कोणतीही डीलरशिप किंवा फ्रेंचाइजी मॉडेल चालवत नाहीये, शिवाय आम्ही कोणी डीलर नियुक्त करण्यासाठी एखाद्या फ्रेंचाइजी किंवा एजंटचीही नियुक्त केलेलं नाहीये. तसेच, फ्रेंचाइजी नियुक्त करण्याच्या नावाखाली आम्ही पैसेही आकारत नाही आहोत”, असं रिलायन्स रिटेलने एक व्हिडिओ पोस्ट स्पष्ट केलं आहे.

Must Read

तीन कोटी किराणा दुकानदार आणि १२ कोटी शेतकऱ्यांना आपल्या नेटवर्कशी जोडण्याचं जिओमार्टचं (Jio mart)लक्ष्य आहे. जिओमार्टवर दररोज 4 लाखांपेक्षा जास्त ऑर्डर बुक केल्या जात आहेत. jiomart.com ही कंपनीची खरी वेबसाइट आहे. कंपनीने फसवणूक करणाऱ्या 10 वेबसाइट्सची यादीही जारी केली आहे. बघूया कोणत्या आहेत या 10 वेबसाइट –
jmartfranchise.in
jiodealership.com
jiomartsfranchises.online
jiomart-franchise.com
jiomartindia.in.net
jiomartfranchise.co
jiomartfranchises.com
jiomartshop.info
jiomartreliance.com
jiomartfranchiseonline.com.