bajaj platina 100 es review

bajaj platina 100 es review - बजाजची स्वस्त बाइक Platina 100 ES (इलेक्ट्रिक स्टार्ट) आता नवीन डिस्क व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. Platina 100 ES डिस्क व्हेरिअंटची देशभरात बुकिंग आणि डिलिव्हरीलाही सुरूवात झाली असून डिस्क व्हेरिअंटमध्ये आलेली नवीन प्लॅटिना आधीच्या फ्रंट ड्रम ब्रेक व्हेरिअंटच्या तुलनेत जवळपास 2200 रुपयांनी महाग आहे.Must Readbajaj platina 100 es specifications -

इंजिन आणि फीचर्स :
240mm फ्रंट डिस्क ब्रेकमुळे या 100cc बाइकच्या ब्रेकिंग परफॉर्मन्समध्ये जबरदस्त सुधारणा होईल, असं कंपनीने म्हटलं आहे. बाइकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स युनिटसोबत 102cc, DTS-i, सिंगल-सिलिंडर इंजिन असून हे इंजिन 7.9hp ची पॉवर आणि 8.3Nm टॉर्क निर्माण करतं. 90 किलोमीटर प्रतितास इतका प्लॅटिनाचा टॉप स्पीड आहे. तर, 11 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे आहे. नवीन डिस्क ब्रेकचे व्हेरिअंट प्लॅटिनाचे वजन 119 किलोग्रॅम आहे. तर फ्रंट ड्रमच्या व्हेरियंटचे वजन 117.5 किलोग्रॅम आहे.

किंमत :
बजाज प्लॅटिना 100 दमदार माइलेजसाठी (bajaj platina 100 es review)ओळखली जाते. नवीन डिस्क व्हेरिअंटमधील प्लॅटिना 90 किलोमीटर प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. बाइकमध्ये LED DRL, टँक पॅड, रूंद रबर फुटपॅड्स आहेत, याशिवाय अन्य 100cc बाइक्सच्या तुलनेत लांब सीट आहे. नवीन प्लॅटिना आधीच्या फ्रंट ड्रम ब्रेक व्हेरिअंटच्या तुलनेत जवळपास 2,221 रुपयांनी महाग आहे कंपनीने डिस्क व्हेरिअंटमध्ये आलेल्या इलेक्ट्रिक स्टार्ट प्लॅटिना 100  ची एक्स-शोरूम किंमत 60 हजार 698 रुपये ठेवली आहे.